Eathing Habits : जेवणाच्या ताटातील पदार्थ काय क्रमानं खावेत? तुम्ही चूक करत नाही आहात ना?
जेवताना नेमका कोणता पदार्थ कधी खावा आणि कधी खाऊ नये? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? पडला असे तर, एकदा ही सोपी पण तितकीच महत्त्वाची माहिती वाचा आणि कायम लक्षात ठेवा
जेवणाच्या ताटातील गोडाचा पदार्थ शेवटी खात असाल तर आताच ही सवय बदला आणि तो पदार्थ पहिला खाण्याची सवय ठेवा. ज्यामुळं तुमच्या पचनक्रियेत बाधा येणार नाही.
पचनसंस्थेला बिघडवणारं थंड पाणी जेवताना पिणं टाळा. त्याएवजी ताक पिण्याला प्राधान्य द्या.
सहसा सॅलड थंड असतात आणि आपलं जेवण गरम. त्यामुळं अशा पदार्थांना एकत्र खाणं टाळा.
अन्नाचा प्रत्येक घास किमान 20 ते 30 वेळा चावून खा. म्हणजे तो पचण्यास त्रास होणार नाही.
अन्नपदार्थ कोणताही असो, तो खात असताना उपकरणांचा वापर टाळाय. अन्नाशी एक वेगळं नातं जोडू पाहा.
अन्नाच्या प्रत्येक घासानंतर एक दीर्घ श्वास घ्या. ते घाईघाईनं ग्रहण करु नका. असं केल्यास पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो.
जेवणानंतर काही गोष्टी प्रकर्षानं टाळा. त्या म्हणजे भराभर चालणं आणि अंघोळ करणं, लगेचच झोपणं. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)