भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन C, K, A, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर सारखे पोषक घटक आढळतात.
यामध्ये पाण्याचे प्रमाण देखील चांगले असते, ज्यामुळे ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. त्यासोबत कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन B12, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात.
उन्हाळ्यात अनेकांना दह्याचे ताक बनवून प्यायला आवडते.
दुधी भोपळ्याचा रायता आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दुधी भोपळा शरीराला हायड्रेट करण्यास, वजन कमी करण्यास, उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास, तणाव कमी करण्यास आणि कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो.
दुधी भोपळा किसून घ्यावा आणि त्याला दह्यात मिसळून रायता तयार करावा. या रायत्यामध्ये दह्यातील प्रथिने देखील एकत्र होतात. ज्यामुळे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
दुधी भोपळ्यात कमी कॅलरीज असतात. मात्र, फायबर आणि पाणी भरपूर प्रमाणात असते, जे वजन कमी करण्यास मदत करू शकते.
दुधी भोपळा पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
रायता जास्त घट्ट नसावा आणि त्यात भोपळ्याचे पाणी राहिले पाहिजे. भोपळ्याचे पाणी किसून झाल्यानंतर ते फेकून न देता रायत्यात मिसळावे. तुम्ही त्यात लाल मिरची पावडर आणि मीठ घालून त्याची चव वाढवू शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)