सावधान! भेंडीसोबत 'हे' पदार्थ खाल्ल्यास होऊ शकतो धोका

Intern
May 17,2025


भेंडीची भाजी अनेकांना, विशेषतः लहान मुलांना खूप आवडते.


मात्र, काही विशिष्ट पदार्थ असे आहेत, जे भेंडीसोबत खाणे टाळले पाहिजे. अन्यथा यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक त्रास होऊ शकतात.


पाहूयात भेंडीसोबत कोणते पदार्थ टाळावेत:

1. कारले

भेंडीसोबत कारल्याचे सेवन करू नये. या दोन्ही भाज्यांचे गुणधर्म वेगवेगळे असल्याने त्यांचे एकत्र सेवन केल्यास पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

2. मुळा

मुळाही भेंडीसोबत खाणे टाळावे. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास गॅस, अपचन किंवा पोटदुखी होण्याची शक्यता असते.

3. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

भेंडीसोबत दूध, दही, ताक किंवा पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत. यामुळे त्वचेसंबंधित समस्या किंवा अ‍ॅसिडिटी वाढू शकते.

4. आंबट पदार्थ

भेंडीसोबत लिंबू, चिंच, आमसूल यांसारखे आंबट पदार्थ खाणे टाळा. त्यामुळे पचनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

5. चहा

भेंडी खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नये. यामुळे पचनावर ताण येऊ शकतो.

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story