लोणचं वर्षभर साठवून ठेवण्याची पद्धत फार आधीपासून आहे. लोणचं जितकं जुनं तितकी त्याची चव चांगली लागते अशी समज आहे.
जेवणासोबत लोणचं आपण नेहमीच आवडीने खात असतो. लोणचं जेवणाची चव तर वाढवतेच पण याचं अतिसेवन शरीरास हानिकारक ठरू शकतं.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते लोणचं जेवढ जुनं तेवढे अधिक मुक्च रॅडिकल्स त्यामध्ये तयार होत असतात. रॅडिकल्स अन्नातून ऑक्सिजन काढून टाकतात.
लोणचं जेवढं जुनं तितकं तुमच्या शरीरात कर्करोगासारखे आजार वाढण्याचा धोका असतो.
एखाद्या पदार्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकून ते वर्षानुवर्ष ठेवल्यास पदार्थ कुजतो. यामुळे त्यात फ्रि रॅडिकल्स तयार होतात.
तुम्हाला लोणचं आवडत असेल तर त्याचं अधूनमधून सेवन करा.लोणच्याला रोजच्या आहाराचा भाग बनवू नका. यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)