रोजच्या आहारात लोक कोणत्या न कोणत्या स्वरूपात साखरेचे सेवन करतात. साखर थोड्या प्रमाणात खाल्ली तरी तिचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
साखर खाल्ल्याने शरीरात विविध आरोग्याशी निगडित समस्या उद्भवू लागतात.
मधुमेह असलेल्या रुग्णांनी साखर जास्त प्रमाणात खाल्ली तर त्यांचा रक्तातील साखरेचा स्तर अधिक वाढतो. अशा रुग्णांनी साखरेपासून दूर राहणे गरजेचे आहे.
साखरेचे अधिक सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. ज्यामुळे इतर गंभीर आजार होण्याची शक्यता निर्माण होते.
जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यास हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळीही वाढते.
साखरेमध्ये कॅलरीज अधिक असल्याने तिचे जास्त सेवन करु नये. अन्यथा वजन लवकर वाढू लागते.
साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मानसिक तणाव, थकवा, अधिक झोप येणे हे त्रास होऊ शकतात. याला 'ब्रेन फॉग' असे म्हटले जाते.