दररोज अंड खाल्ल्यास शरीरावर कसा होतो परिणाम?

दर दिवशी अंड्यांचं सेवन?

दर दिवशी ब्रेकफास्ट किंवा जेवणामध्ये अंड्याचा समावेश करून त्यांचं सेवन करणाऱ्यांपैकी तुम्हीही आहात का?

प्रोटीन

अंड्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असल्यामुळं त्यानं भूक कमी लागते. परिणामी अंड्यांच्या सेवनामुळं पोट भरलेलं राहतं आणि पर्यायी गरज नसतानाचं खाणं न झाल्यामुळं वजन नियंत्रणात राहतं.

स्नायूंना बळकटी

अंड्यांच्या सेवनामुळं स्नायूंना बळकटी मिळते. अंड्यांमध्ये असणारे अमिनो अॅसिड प्रोटीन यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

मेंदूची कार्यक्षमता

एका अंड्यांमध्ये साधारण 6 ते 7 ग्रॅम प्रोटीन घटक असतात. ज्यामुळं स्नायू अधिक बळकट होण्यास मदत होते. अंड्यांमध्ये असणारा लेसिथिन नावाचा घटक मेंदूची कार्यक्षमता वाढवतो.

हृदयाचं आरोग्य

3 ते 5 अंड्यांचा पांढरा भाग दर दिवशी खाल्ल्यास त्यामुळं हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं असं काही निरीक्षणांतून सिद्ध झालं आहे.

एकाग्रता

दर दिवशी अंड खाल्ल्यामुळं एकाग्रता आणि स्मरणशक्तीसुद्धा वाढते असं म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर दृष्टीदोषही दूर होण्यास मदत होते. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story