ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप येते? फॉलो करा या ट्रिक्स, फ्रेश राहाल

पाणी प्या

झोप उडवण्यासाठी एक पेला थंडगार पाणी प्या. लगेच ताजेतवाने व्हाल.

फेरफटका मारा

ऑफीसमध्येच किंवा ऑफीसच्या आवाराच्या आसपास फेऱ्या मारा. चालण्याची क्रिया शरीराला कार्यक्षम बनवते.

कॉफी किंवा ग्रीन टी प्या

कॉफी किंवा ग्रीन टी सारखी प्येये झोप उडवतात. कॉफी एकदम कार्यक्षम बनवते. आळस घालवते.गरम प्येये ताकद वाढवतात.

पौष्टिक पदार्थ खा

पचायला हलक्या असणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करा.सुकामेवा खा ,वेगवेगळी फळे खा. झोप येणार नाही आणि शरीरात ताकद राहील.

प्राणायाम करा

5 मिनिटांसाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करा,श्वासावर लक्ष केंद्रित करा .असे केल्याने शांतता मिळते आणि सुसूत्रता वाढते.

डोळ्यांना आराम द्या

सतत संगणकासमोर बसल्यामुळे मेंदू थकतो त्यामुळेसूद्धा झोप येते, म्हणून थोडवेळ संगणकापासून लांब राहा आणि डोळ्यांना आराम द्या.त्यासाठी 20-20-20 नियम पाळा ,दर 20मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दुर नजर फीरवा.

स्ट्रेचिंग करा

बसल्या-बसल्या अवयवांचा सोपा व्यायाम करा,स्ट्रेचिंग केल्याने आराम मिळतो, आखडलेली हाडे , स्नायू मोकळे होतात.

सक्रीय राहा

तुमच्या लक्ष्याकडे मन वळवा .स्वतःला आठवण करुन द्या की तुम्हाला काम पुर्ण करायचे आहे.सतत सक्रीय राहिल्यास झोप येत नाही

VIEW ALL

Read Next Story