मेथी दाणे आणि मध हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर असतं. या दोघांचं सेवन हे शरीरासाठी रामबाण उपाय असल्याचं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
मेथीच्या सेवनामुळे आपल्याला व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिइंट्स, फायबर, प्रोटीन आणि आर्यन मिळतं. जे शरीराला अनेक आजारांपासून बचाव करतो.
तर मधाचं सेवन कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, मँगनीज, जस्त आपल्याला मिळतं. त्याशिवाय अनेक पोषक घटक मधामधून मिळतो. त्यासोबत वजन कमी होण्यास मदत होते.
मेथी आणि मध यांचं एकत्र सेवन केल्यामुळे वाढत्या कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी मेथी आमि मधाचं सेवन मदतगार ठरतं.
तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज मध आणि मेथीचं सेवन तुम्हाला फायदेशीर ठरेल.
मेथीचं दाणे आणि मधाचं सेवन केल्यामुळे शरीरावरील सूज येण्याची समस्या दूर होते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)