तुम्हालाही रात्री येत झोप येत नाही? निद्रानाश जडलाय... मग 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

रात्री का येत नाही झोप?

शरीरात मेलाटोनिन आणि सेरोटोनिनची पातळी कमी झाली की निद्रानाश किंवा झोपे न येण्याची समस्या होऊ शकते.

झोपेच्या गोळ्यांचे सेवण करता का?

झोपेच्या गोळ्या आरोग्यासाठी तितक्या चांगल्या नसून त्याजागी तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेष करा ज्यानं तुम्हाला शांत झोप येईल.

अक्रोड

अक्रोड खाल्ल्याने शांत झोप येते. याशिवाय अक्रोडमध्ये फॅटी ऍसिड असतात त्यामुळे झोप येण्याची शक्यता वाढते. त्यात असेलेल्या फॅटी -अॅसिड्स आणि इतर गुणधर्मांमुळे शरिरातील सेरोटोनिनचे उत्पादन वाढवते आणि शांत झोप येते.

केळी

केळीत मॅग्नेशियम, ट्रायप्टोफॅन, व्हिटॅमिन बी 6, कार्ब आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. तुमच्या रोजच्या आहारात एक किंवा दोन केळ्यांचा समावेश केल्यास चांगली झोप येण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

रोस्टेड भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया ट्रिप्टोफॅनचा नैसर्गिक स्रोत आहेत, एक अमीनो आम्ल ज्यामुळे झोप येते ते देखील मोठ्या प्रमाणात आहे.

भिजवलेले चिया सीड्स

चिया सीड्समध्ये ट्रिप्टोफॅन, एक अमीनो ऍसिड असते जे मूड सुधारत आपल्या आरोग्याला अनेक फायदे करते. चिया सीड्स या पाण्यात, दुधात घालून किंवा सॅलड्स किंवा स्मूदीजमध्ये घालून सेवन करू शकता.

बार्लीचे पावडर

बार्लीची हिरवी पावडरचे सेवन केल्यानं गाढ झोप लागते. यात कॅल्शियम, ट्रिप्टोफॅन, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते त्यानं शांत झोप येते.

कोमट दूध

झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्या त्यानं नक्कीच शांत झोप येईल.

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story