अपचनामुळं पोटात गॅस वाढतो, ज्यामुळं वारंवार ढेकर येतात. यामध्ये पोट फुगणं, आतड्यांना सूज, पोट जड वाटणं अशा समस्या उदभवतात.
गॅस्ट्रोओफेगल रिफ्लक्स डिजीस या स्थितीमध्ये अॅसिड एसोफेगसमध्ये परत येतं आणि यामुळं जळजळ, करपट ढेकर आणि गिळण्यास त्रास होतो.
हायटल हर्नियामध्ये डायाफ्रामच्या मांसपेशी कमकुवत होतात. याममध्ये छातीत जळजळ आणि सतत ढेकर येत राहतात.
पँक्रियाटायटीसमध्ये पँक्रियासमध्ये सूज येऊन त्यामुळं मळमळ, ढेकर, पोटदुखी अशा व्याधी सतावतात.
काही प्रकरणांमध्ये वारंवार येणारे ढेकर पोटाच्या कर्करोगाचे संकेत असू शकता. यामध्ये भूक न लागणं, वजन कमी होणं, पोट दुखणं अशा समस्या उदभवू शकतात
(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)