मधुमेहाच्या रूग्णांनी रक्ताची तपासणी नियमितपणे करणं गरजेच असतं.रक्तातील साखरेची चाचणी दोन प्रकारे केली जाते.
एक म्हणजे रक्तवाहिनीतून रक्त घेऊन लॅबमध्ये टेस्ट केली जाते आणि दुसरी म्हणजे हाताच्या बोटातून रक्त घेऊन ग्लायकोमीटर वापरून घरीच तपासलं जातं.
पण तुम्हाला माहित आहे का ज्यावेळी तुम्ही ग्लायकोमीटरमधून रक्तातील साखर तपासता तेव्हा कोणत्या बोटातून रक्त घ्यायला ह
उजव्या बोटातून रक्त न घेतल्यास शुगर टेस्ट करणं निरर्थक ठरेल. diabetes.co.uk नुसार चाचणीसाठी रक्त फक्त मधल्या किंवा अनामिकेतून घेतले पाहिजे.
चाचणी करत असताना हात हृदयाच्या पातळीच्या खाली ठेवावा.
जर एखाद्या व्यक्तीचा हात त्याच्या हृदयावर असेल तर गुरूत्वाकर्षण या भागात रक्त प्रवाहविरूद्ध कार्य करू शकते.
मधले बोट मधुमेहाच्या चाचणीसाठी सर्वोत्तम मानले जाते कारण त्यात रक्ताभिसरण उत्तम असते.