आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्य़ास डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घेतली जातात.
डॉक्टरांनी दिलेल्या या औषधांमध्ये काही अशी औषधं अशीही असतात ज्यांच्यावर आवरण असतं. कॅप्सूल म्हणूनच त्या औषधांकडे पाहिलं जातं.
मुळात त्या आवरणालाच कॅप्सूल म्हणतात. अनेकांचा समज असतो की, ते जनावरांच्या चर्बीपासून तयार केलं जातं.
कॅप्सूल कव्हर दोन प्रकारचे असून एक हार्ड शेल्ड आणि एक सॉफ्ट शेल्ड असतं.
हे कव्हर प्राण्यांसमवेत वनस्पतींपासून मिळणाऱ्या द्रव्यरुपी प्रोटीनपासून बनवलं जातं.
जे कॅप्सूल कव्हर प्राण्यांच्या प्रोटीनपासून बनवतात त्या घटकाला जिलेटीन म्हणतात.
कॅप्सूल कव्हरसाठी जिलेटीन कोंबडी, मासे, डुक्कर यांच्या हाडं किंवा चर्बीला उकळून तयार केलं जातं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)