सर्दीनं असो किंवा मग विनाकारण, कधी सहज शिंक आली की अनकेदा नाक आणि तोंडावरून रुमान धरून मंडळी शिंकतात.
शिंकताना आणखी एक कृती नकळत घडते ती म्हणजे डोळे आपोआप बंद होण्याची. यामागचं कारण जाणून घेण्यासाठी लक्षात घ्या शिंक का येते?
मानवी शरीरातील अवयव एकमेकांशी जोडले गेले आहेत. कोणीही व्यक्ती जेव्हा शिंकते तेव्हा शिंकण्याचा वेग 160 किमी प्रतितास इतका असतो.
श्वाशोच्छवासाच्या प्रक्रियेदरम्यान अनेक धुलिकण श्वासनलिकेमध्ये अडकतात. हेच धुलिकण काढण्यासाठी म्हणून शिंक येते.
शिंकण्याच्या प्रक्रियेमध्ये डोळ्याच्या तीन नसा काम करतात. या नसा अतिशय नाजूक असतात. त्यामुळे जेव्हा शिंक येते तेव्हा डोळे उघडे राहिल्यास येणारा दाब नसांना झेलता येत नसल्यानं डोळे आपोआप बंद होतात.
शिंकताना मांसपेशी ओढल्या जातात ज्यामुळंसुद्धा डोळे बंद होतात, हे या क्रियेमागचं आणखी एक कारण.
जेव्हा शिंक येते तेव्हा मेंदूतील मेड्युला ऑब्लांगेटा डोळ्यांच्या पापण्या मिटण्याचे संकेत देतो आणि डोळे मिटतात. शिंकताना फुफ्फुसांमध्ये असणारी हवासुद्धा या प्रक्रियेदरम्यान बाहेर येते आणि त्याच कारणानं शिंकताना आवाजही होतो.