शरीरात वाहणाऱ्या रक्ताचा रंग लालच असतो हे तर सर्वचजण जाणतात.
पण, या रक्ताचा रंग लालच का असतो? तो पिवळा, निला किंवा हिरवा का नसतो?
रक्ताचा लाल रंग त्यातील एक प्रकारचं प्रोटीन आणि हिमोग्लोबिनमुळे असतो.
हिमोग्लोबीन हे एक प्रकारचं आयर्नयुक्त प्रोटीन आहे.
या प्रोटीनचं काम असतं शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करणं आणि कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसांपर्यंत आणणं.
सोप्या शब्दांत सांगावं तर हिमोग्लोबीनचं मुख्य काम आहे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेणं.
म्हणूनच शरीरातील या अतीव महत्त्वाच्या घटकामुळं रक्ताचा रंग लाल असतो आणि याच हिमोग्लोबीनची कमतरता असल्यास अनेक व्याधी शरीराला निशाण्यावर धरू शकतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24तास त्याची खातरजमा करत नाही.)