यामध्ये अनेक संयुगे आढळतात जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. अँटीवायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे ते बॅक्टेरिया किंवा व्हायरसला वाढण्यापासून रोखते.
हळद अतिशय शक्तिशाली मसाला मानला जातो. यात कर्क्यूमिन नावाचे एक संयुग असते ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि ते रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याचे काम करतात.
खोकल्यासाठी आणि घसादुखीसाठी याचा वापर केला जातो. पांढर्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे संक्रमण आणि रोगांशी लढा दिला जाऊ शकतो.
मेथीच्या बियांमध्ये सॅपोनिन्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड्स सारखी संयुगे असतात, ज्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. हे संयुगे पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवतात असे मानले जाते.
दालचिनीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. शरीरातील कोणत्याही विषाणूची वाढ थांबवण्याचे काम करते.
देशभरात ताप, खोकला, थकवा आदी लक्षणांचे रुग्ण वाढत आहेत. ICMR ने ही साथ H3N2 मुळे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे हा व्हायरस चर्चेत आला. हा व्हायरस टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे.