याशिवाय देखील एरंडेल तेलाचे अनेक फायदे आहेत. एरंडेल तेलाचा गुणधर्म उष्ण असल्याने संधीवातावर रामबाण उपाय आहे.
थंडीत तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर एरंडेल तेलाने मसाज केल्याने आराम पडतो.
याशिवाय देखील एरंडेल तेलाचे अनेक फायदे आहेत. एरंडेल तेलाचा गुणधर्म उष्ण असल्याने संधीवातावर रामबाण उपाय आहे.
सतत अपचनामुळे बद्धकोष्टतेचा त्रास होत असेल तर एरंडेल तेलाच्या सेवनाने पोट साफ होतं.
जर तुमची कोरडी त्वचा असेल तर, त्वचेला एरंडेल तेलाचा मसाज करा, असं केल्याने त्वचेला मॉइश्चरायझिंग मिळत आणि त्वचेतील ओलावा टिकून राहतो.
तुमचे ओठ थंडीत कोरडे पडत असतील तर रात्री झोपताना ओठांना एरंडेल तेलाचा हलकासा मसाज करा. असं केल्याने ओठ मुलायम होतात.
एरंडेल तेलाने दात साफ केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होते. दातात अडकलेले अन्नाचे कण निघून जातात त्यामुळे दात मजबूत होतात.
अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांना सूज येते अशावेळी डोळ्यांच्या खाली एरंडेल तेलाने हलकासा मसाज करा. त्यामुळे डोळ्यांची सूज कमी होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)