चांदीहूनही मौल्यवान...

आयुर्वेदाचार्यांच्या माहितीनुसार दालचिनीच्या सेवनामुळं पचनक्रिया सुरळीत होते, शिवाय दात आणि डोकेदुखीही दूर पळवता येते. आजारपणापासून शरीरात एक कवच म्हणून काम करणारा एक पदार्थ म्हणूनही या दालचिनीकडे पाहिलं जातं.

Nov 21,2023

औषधी वनस्पती

बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया (BSI) चे संचालक डॉ. सुधांशु कुमार जैन दालचिनीचा उल्लेख एक औषधी वनस्पती म्हणून करतात. आतड्यांच्या आरोग्यासाठी ती रामबाण उपाय म्हणून वापरली जाते. दालचिनीमुळं रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.

विटामिन ए, बी, सी

‘Spices And Condiments’ या पुस्तकात देण्यात आलेल्या माहितीनुसार दालचिनीमध्ये कार्बोहाइड्रेट, कॅल्शियन, फॉस्फोरस, लोह, सोडियम, पोटॅशियम असे घटक आढळतात. शिवाय विटामिन ए, बी, सीचंही प्रमाण जास्त असल्याचं आढळतं.

शरीराचं नुकसान

फ्री रेडिकल्समुळं शरीराचं होणारं नुकसान दालचिनीमध्ये असणाऱ्या एंटिऑक्सीडेंटमुळं मोठ्या फरकानं कमी होतं. शरीरात होणाऱ्या पचनसंस्थेदरम्यान हे फ्री रेडिकल्स तयार होतात. ज्यामुळं शरीरातील अंतर्गत कोशिकांना नुकसान पोहोचतं.

सांध्यांचं आरोग्य

दालचिनीमध्ये Anti Inflammatory गुण असल्यामुळं त्याचा फायदा सांध्यांच्या आरोग्यासाठी होतो. सांधेदुखी आणि त्यांची सूज कमी करण्यासाठी दालचिनी फायद्याची ठरते. दालचिनीच्या सेवनामुळं शरीरातील तापमान नियंत्रणात राहतं. त्यामुळं विविध भाज्या, खाद्यपदार्थांच्या माध्यमातून दालचिनीचं सेवन नक्की करावं.

पाळंमुळं श्रीलंकेत

दालचिनीच्या उत्पत्तीविषयी सांगावं तर, त्याची पाळंमुळं श्रीलंकेत सापडतात. कैक हजार वर्षांपूर्वी ही दालचिनी दक्षिण भारतात आली असंही सांगितलं जातं. ख्रिस्तधर्मग्रंथ बायबलमध्येही दालचिनीचा विशेष संदर्भ आहे.

बापरे.. इतकी किंमत?

हजारो वर्षांपूर्वी याच दालचिनीला चांदीहूनही जास्त महत्त्वं होतं. Natural History पुस्तकातील वनस्पतीशास्त्राच्या धड्यामध्ये देण्यात आलेल्या संदर्भानुसार 350 ग्राम दालचिनीची किंमत 5 किलोग्राम चांदीइतकी होती.

VIEW ALL

Read Next Story