फायदे

पॉपकॉर्न खाण्याचे जबरदस्त फायदे माहितीयेत?

Feb 16,2024

हृदयाचं आरोग्य

फायबर, पॉलिफिनॉलिक कंपाऊंड, अँटी ऑक्सिडेंट, व्हिटामिन B कॉम्प्लेक्स, मँगनीज, मॅग्नेशियम असे घटक पॉपकॉर्नमध्ये असतात. त्यावर काळिमिरी पूड किंवा लसूण पूड टाकून खाल्ल्यास हृदय निरोगी राहतं.

तंतूमय घटक

पॉपकॉर्नमध्ये तंतूमय घटक जास्त असल्यामुळं त्याच्या सेवनानं शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळं हृदयविकारांचा धोकाही कमी होतो.

पचनक्रिया

मक्याचा फुलवलेला दाणा असणारा हा पॉपकॉर्न एक उर्जास्त्रोत आहे. यामुळं पचनक्रिया सुधारते. अपचन आणि पोटाचे विकारही दूर होतात.

भूक भागते

पॉपकॉर्नमधील वरील सर्व घटकांमुळं तो भूक भागवतो आणि ती नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो. पॉपकॉर्नमुळं कॅलरी वेगानं वाढत नाहीत.

मधुमेह असणाऱ्यांना सल्ला

पॉपकॉर्नमध्ये असणारं फायबर मधुमेह आणि इंसुलिनचं प्रमाण कमी करतं. म्हणून मधुमेह असणाऱ्यांना पॉपकॉर्न खाण्याचा सल्ला दिला जातो.

त्वचेचं आरोग्य

पॉपकॉर्न हा त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम खाऊ असून, त्यामुळं चेहऱ्यावरील सुरकुत्या, वाढच्या वयाची चिन्हं, केसगळती अशा समस्या दूर होतात.

VIEW ALL

Read Next Story