तुम्ही रात्री जेवणानंतर लगेच झोपता? तर आता ही सवय बदलण्याची वेळ आहे.
जेवणानंतर 10 मिनिट चालण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
जेवणानंतर लगेच झोपल्यामुळे पचन क्रिया मंदावते, त्यामुळे रोज रात्री चालणे महत्त्वाचे आहे.
काही अभ्यासांनी दाखवले आहे की, जेवणानंतर 10 मिनिट चालल्याने मेटाबॉलिझमची गती वाढते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
जेवणानंतर चालल्यामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
चालण्यामुळे शरीरात 'हॅपी हॉर्मोन्स' रिलीज होतात, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि गाढ झोप लागते.
याशिवाय चालणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)