आरोग्य विमा घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा हेल्थ इन्शुरन्स रिजेक्ट केला जाऊ शकतो.
पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील जेणेकरून दाव्याच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही.
विमा क्लेम करताना चुकीच्या पद्धतीने भरलेला अर्ज, कागदपत्रांच्या अभावामुळे तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विमा प्रक्रिया समजून घेण्यासाठी, तुम्ही प्रथम विमा कंपनीशी संपर्क साधला पाहिजे.
पॉलिसी विकताना आरोग्य विमा कंपन्या आधीपासून अस्तित्वात असलेला कोणताही आजार कव्हर करत नाहीत. त्यामुळे या आजाराने आजारी पडल्यास विमा क्लेम करता येत नाही.
एखादा आजार आधीपासून अस्तित्वात आहे अन् तुम्ही तो आजार लपवला असेल तर तुम्हाला क्लेम करता येणार नाही. ऐनवेळी तुम्हाला मोठी रक्कम भरावी लागू नये, म्हणून आजार न लपवलेलं चांगलं.
विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला विशिष्ट कालावधीची प्रतीक्षा करावी लागेल. आधीपासून जर आजार असेल आणि त्यावर उपचारासाठी क्लेम करायचा असेल तर त्याला काही विशिष्ट कालावधी लागतो.
अज्ञात परिस्थिती टाळण्यासाठी तुम्ही पॉलिसीशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. तुम्हाला काही शंका असल्यात तुम्ही थेट कंपनीशी संपर्क करून सल्ला मागू शकता.
दरम्यान, तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हेल्थ विमा असणं नेहमी फायद्याचं ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही आरामात आयुष्य जगू शकता.