कोलेस्ट्रॉल शरिराला निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं. पण जेव्हा ते शरिरात वाढतं तेव्हा सायलेंट किलर ठरतं.
शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्यास व्यक्तीला अनेक आजार होऊ शकतात. तसंच हार्ट अटॅक, स्ट्रोक यांची भीती असते.
हाय कोलेस्ट्रॉल शऱिरात धीम्या गतीने वाढत असतं. पण जेव्हा याची माहिती मिळते तेव्हा शरिराचं फार नुकसान झालेलं असतं.
कोलेस्ट्रॉल वाढल्यास नसा ब्लॉक होतात. काही स्थितींमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होतो.
वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधांसह काही घऱगुती उपचारही करु शकतो.
आरोग्य तज्ज्ञांनुसार, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी लसूण खाणं फायदेशीर आहे. हे कोलेस्ट्रॉल कमीही करु शकतं.
तज्ज्ञ सांगतात की, लसणात एलिसिन नावाचं कंपाऊंड असतं जे खराब कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासह ब्लड शुगरही कमी करतं. तसंच हार्ट आणि कॅन्सरसारखे आजारांची जोखीमही कमी करतं.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी एक लसूण ठेचून एक ग्लास पाण्यात टाकून पिऊ शकता.
तुम्ही लसणाची चहाही पिऊ शकता. यासाठी लसूण ठेचा आणि एक कप पाण्यात मिसळून ते गरम करा. थंड झाल्यानंतर त्यात मध आणि लिंबू रस मिसळून प्या
लसणाचं सेवन केल्याने पचनही सुधारतं. साखर, ह्दय, मेंदू, खोकला, सर्दी आणि कॅन्सरसारख्या आजारांची जोखीमही हे कमी करतं. लसूण त्वचेसाठीही चांगला आहे.