मग जरा जपून; कारण
मनुके खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मनुक्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, विटॅमी बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर हे घटक आढळतात.
तुम्ही पण मनुका दररोज खात असाल तर थांबा. कारण मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चुकूनही मनुक्यांचे सेवन करु नका. मनुक्यात फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्याने झपाट्याने वजन वाढतं.
जास्त प्रमाणात मनुक्याचे सेवन केल्यास तुम्हाला उलटी आणि डायरियाची समस्या जाणवू शकते.
जर तुमची पचनसंस्था ठीक नसल्यास चुकुनही मनुक्यांचे सेवन करु नका. कारण तुमचं पोट मनुक्यांना योग्यपणे पचवू शकतं नाही.
ज्यांना हृदयासंबंधी आजार आहेत, त्यांनी मनुक्यांचे सेवन करु नयेत.
मनुके जास्त खाल्याने त्वचेला खाज सुटणे आणि रॅशेज होण्याची समस्या होते. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय या लोकांनी मनुक्यांचं सेवन करु नका. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)