हाडं... मानवी शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा घटक असून त्याचमुळं शरीराला आकारा आणि आधार मिळतो.
हाडं मजबूत असली तरीही ती आतून मात्र ती नाजूक पेशींपासून तयार झालेली असतात. त्यामुळं केस आणि त्वचेप्रमाणेच त्यांची वाढ होऊन रचना बदलत राहते.
शरीराच्या मांसपेशी, नसा यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचं रक्षण करणं हे हाडांचं काम असतं.
एका सुदृढ व्यक्तीच्या शरीरातील हाडांचं वजन 10 ते 15 किलो इतकं असतं. हाडांचं वजन हे शरीरातील साधारण 15 टक्के इतकं असतं.
जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्यांच्या शरीरात एकूण 270 हाडं असतात.
शरीराची वाढ होत असताना काही हाडं नैसर्गिकरित्या जोडली जाऊन त्याची संख्या 206 ते 213 होते.
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात हाडांची संख्या कमीजास्त असून ती फुफ्फुसाभोवती असणारा हाडांचा पिंजरा आणि बोटाच्या रचनेवर आधारित असते.