पावसाळ्यात त्वचेला सतत खाज येतेय? दहा रुपयांत मिळवा रामबाण उपाय, कसा ते पाहाच
दमट वातावरणामुळं त्वचाविकार अगदी सहजपणे वाढतात. संसर्ग फोफावतात. अशा वेळी नेमकं काय करावं हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. तेव्हा एक गोष्ट तुम्हाला मोठी मदत करेल हे कायम लक्षात ठेवा.
आश्चर्य वाटेल, पण कडुलिंबाचा अवघ्या दहा रुपयांना मिळणारा पालाही/ कडुलिंबाची लहानशी जुडी तुमची या त्रासापासून सुटका करेल.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक प्रमाणात पाण्याच्या संपर्कात येत असल्यामुळं त्वचेवर कडुलिंबाच्या पाल्याचा लेप लावणं कधीही फायद्याचं.
कडुलिंबाच्या पानांपासून मुळांपर्यंत आणि अगदी फांद्यांपर्यंत प्रत्येक घटकाचा त्वचा रोगावर उपचार म्हणून वापर करता येतो.
रोगजंतूंचा नाश करणारे गुण असल्यामुळं ही पानं अंघोळीच्या पाण्यात उकळून त्या पाण्यानं अंघोळ केल्यासही त्वचेवरील खाज नाहीशी होते.
दर दिवशी कडुलिंबाचं एक पान खाणंही शरीरासाठी फायद्याचं ठरतं. कडुलिंबाच्या तेलाचा वापरही त्वचेसाठी करता येतो.
तेलाचे गुणधर्म आणि कडुलिंबाचे गुणधर्म त्वचाविकारांपासून चमत्कारिकरित्या सुटका करतात.
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठीसुद्धा कडुलिंबाचा वापर करता येतो. एखादी जखम झाल्यास मलमपट्टीमध्ये कडुलिंबाची पानं रस निघेपर्यंत चुरून ती जखमेवर बांधावीत. यामुळं जखमेतील जंतूंचा नायनाट होतो.