हिवाळा सुरू होताच सांधेदुखीचा त्रास जाणवू लागतो. हिवाळ्यात तापमान कमी असल्याने स्नायूंची लवचिकता कमी होऊन सांधेदुखी वाढते.
हिवाळ्याच्या दिवसांत सांधेदुखी कमी करण्यासाठी काही नैसर्गिक उपायदेखील आहेत. त्याबाबत आज जाणून घेऊया.
आयुर्वेदानुसार, रोज सकाळी उपाशीपोटी तूप आणि हळदीचे सेवन करावे. यामुळं सांधेदुखीपासून आराम मिळतो.
हळदीत करक्यूमिन नावाचे कपाउंड आढळते. यामुळं अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी ऑक्सीडेंट गुण आढळतात. त्यामुळं सांधेदुखीवर खूप फायदेशीर मानले जाते.
हळदीचे सेवन केल्यास सांधेदुखीवर आराम मिळतो आणि जळजळ कमी करते
तूपात करक्यूमिन आढळले जाते. त्याव्यतिरिक्त तुपाच्या सेवनाने वातसंबंधित रोग दूर होतात.
तुपामध्ये असलेल्या गुणधर्मामुळं सांध्यांमध्ये होणारे घर्षण कमी होण्यात मदत होते.
सकाळी उपाशीपोटी तुपाचे सेवन केल्यास पाचनसंस्थादेखील सुधारते तसंच, शरीरातील सर्व टॉक्सिन बाहेर फेकले जातात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)