कलिंगड फळाचे जबरदस्त फायदे आहेत. उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड खाण्याचा व ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.
मात्र तुम्ही इतर वेळीही कलिंगडाच्या ज्यूसचे सेवन करु शकतात. कलिंगडामध्ये 90 टक्के पाणी असते त्यामुळं त्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात आढळतात व कॅलरीज कमी असतात.
कलिंगडाच्या रसात व्हिटॅमिन ए, सी आणि बी6 भरपूर प्रमाणात आढळते. तसंच, यात अमिनो अॅसिड, अँटी ऑक्सिडेंट्स आणि लिसोपीन हे गुणधर्म आढळतात.
कलिंगडात भरपूर मात्रेत पोटॅशियम आढळते. त्याबरोबर मीठाची मात्राही अगदीच कमी असते.
कलिंगडात असलेले अमीनो अॅसिड हृदयाच्या नसांना आराम पोहोचवते. त्याचबरोबर रक्तप्रवाहही सुरळीत होतो.
कलिंगड मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. यातील अमीनो अॅसिड आर्जिनीनमुळं रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
काही तज्ज्ञांच्या मते, कलिंगडाच्या ज्यूसचे सेवन केल्यास कँन्सरचा धोका कमी होतो. मात्र, अद्याप त्यावर संशोधनाची गरज आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)