रोजच्या वापरातील टोमॅटो हे एक सूपर फूड आहे याची अनेकांना कल्पनाच नाही.
केवळ जेवणाची चव वाढवण्याचं नाही तर आरोग्यासाठीही टोमॅटोचं सेवन फायद्याचं ठरतं.
रोज एक कच्चं टोमॅटो खाणं तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. यामुळे तुम्ही तंदुरुस्त आणि आरोग्यादी राहू शकता. कच्च्या टोमॅटोच्या सेवानेच फायदे जाणून घेऊयात...
कच्चं टोमॅटो हे क जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहे. यामुळे तुमच्या शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचं एक रसायन असतं. यामुळे सुर्याच्या हानीकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यास मदत होते.
टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि फायबर बऱ्याच प्रमाणात असतं. हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.
कच्च्या टोमॅटोमध्ये फायबर अधिक असल्याने त्यामुळे पचनशक्ती अधिक सक्षम होते. म्हणूनच बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगण्याची समस्या असलेल्यांसाठी टोमॅटो फायद्याचं ठरतं.
वजन कमी करायचं असेल तर कच्चं टोमॅटो तुम्हाला फार फायद्याचं ठरतं.
टोमॅटो केवळ तुमच्या शरीराला पोषण देत नाही तर तुमच्या शरीराचं अनेक रोगांपासून संरक्षण करतं.
(टीप- सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून 'झी 24 तास' याला दुजोरा देत नाही.)