शिंक येणं तशी सर्वसामान्य बाब आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला शिंक येत असते.

Oct 05,2023

पण काही लोक शिंकताना आजुबाजूला लोक असल्यास लाजतात.

अशावेळी लोक शिंक रोखण्याचा प्रयत्न करतात.

पण शिंक रोखण्याचा हा प्रयत्न जीवघेणा ठरु शकतो.

ब्रिटनमधील एका व्यक्तीला शिंक रोखण्याची मोठा किंमत मोजावी लागली आहे.

गळ्यात वेदना आणि सूज यासह त्याला श्वास घेण्यात अडथळा येत होता.

शिंक रोखल्याने सर्व प्रेशर गळ्यावर गेल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं.

शिंकेच्या माध्यमातून बाहेर पडणाऱ्या हवेचा दाब फार जास्त असतो.

जर ती कानातून बाहेर पडली तर कानाचे पडदेही फाटू शकतात.

या प्रेशरमुळे डोळे, नाक आणि कानाच्या रक्तवाहिन्याही फुटू शकतात.

VIEW ALL

Read Next Story