केळी हे फळ अनेकजन आवडीने खातात. चवीला गोड असणाऱ्या या केळीचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत.

केळीमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी तसेच वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात.

केळीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करण्यात मदत करतात.

भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते.तसेच केळी खाल्याने वारंवार भूक लागत नाही.

मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.

शरीरात व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता असेल तर यामुळे नैराश्याचा धोका वाढतो. परंतु केळीचे खाल्याने या समस्या दूर होतात.

पोटॅशियम, जस्त, लोह यांसारख्या खनिजांसोबत केळी हे एक ऊर्जेचे मजबूत स्त्रोत आहे.त्यामुळे हाडे मजबुत होतात.

केळ्यात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक ऍसिड सारखी पोषक तत्वे आढळतात जी आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात.

केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे उपयोगी ठरते.

VIEW ALL

Read Next Story