(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)
खजूरमध्ये भरपूर जीवनसत्त्वं, फायबर, अमीनो अॅसिड, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, जे खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.
मनुकामध्ये नैसर्गिक शर्करा असतं जे खराब कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतं. याशिवाय बेदाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि फायबर देखील असतं.
अक्रोडात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशियम असतं. अक्रोड शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतं. साखरेवर नियंत्रण नाही राहिल्यास कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या उद्भवतात.
काजूमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि प्रोटीन असतं. काजूमध्ये असलेल्या अनेक गुणधर्मांमुळे ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फायबर आणि प्रोटीन असतं. बदामामध्ये असलेले अल्फा-लिनोलेनिक ऍसिड हे ओमेगा-3 फॅटी ऍसिडचं एक प्रकार आहे, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.
औषधे आणि काही घरगुती उपायांनी खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित केले जाऊ शकते. रोज 5 ड्रायफ्रूट्स भिजवून खाल्ल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते.