High Cholesterol Signs: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' भागांमध्ये होतात अधिक वेदना

Sep 25,2023


कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात.


जेव्हा आपल्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की, आपलं शरीर काही संकेत देऊ लागते.


गंभीर बाब म्हणजे शरीरात कोलेस्टेरॉलची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढले आहे आणि किती वाढले आहे हे लगेच ओळखता येत नाही.


उच्च कोलेस्ट्रॉलमुळे जास्त काम न करताही थकवा जाणवतो. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, श्वास भरुन येणे किंवा थकवा जाणवण्याची अनेक समस्या जाणवतात.


कोणतेही कारण नसतानाही तुमचे वजन वाढू लागले तर समजून जा हे ही उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे.


जर तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल किंवा हृदयाची धडधड सर्वसामान्य प्रमाणापेक्षा जास्त असेल, तर कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते.


जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तरच तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे दिसू शकतात.

VIEW ALL

Read Next Story