नारळ दूध आणि मध या दोन्ही गोष्टूंना समान प्रमाणात मिक्स केरुन शॅम्पूने व्यवस्थित केस धुतल्यानंतर ब्रश किंवा हाताने हे मिश्रण केसांना 30 मिनिटांसाठी लावल्यानंतर केस धुवून घ्या. याने तुमचे केस हायड्रेट आणि मुळायम राहण्यास मदत मिळते.
एवोकॅडो व्यवस्थित मॅश करुन त्यात ऑलिव्ह ऑइल घालून केसांवर लावून घ्या. एवोकॅडोमध्ये विटॅमिन इ आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये ऍन्टीऑक्सिडेंटचे गुण असतात. जे केसांना डॅमेज होण्यापासून वाचवतात.
केळ्याला मॅश करुन त्यात दही घालून केसांवर लावनं फायदेशीर ठरु शकतं. हे केसांना कंडीशनिंग करण्यास मदत करतं.
ऍलोवेरा जेलमध्ये नारळ तेल मिक्स करुन केसांना लावल्याने त्यांना विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात जे केसांना मॉइश्चराइझ करण्यास मदत करतात.
अंड्याचा पिवळा बलक काढून त्यात थोड्या प्रमाणात ऑलिव्ह ऑइल घालून केसांवर लावल्याने केस मजबूत राहण्यास मदत मिळते.