वजन कमी करण्यासाठी नियमित चालणं हा पर्याय अनेकजण निवडतात.
पण नेमकं कसं चालल्यावर? वजन कमी होण्यास मदत होते? हेच अनेकांना माहिती नसते. याबद्दल जाणून घेऊया.
नॉर्मल नव्हे ब्रिस्क वॉक करा. म्हणजेच नियमितपेक्षा थोडं वेगाने चाला.
नेहमी रिकामी पोटी चाला. फक्त पाणी पिऊ शकता.
सकाळी नाश्ता करण्याआधी वॉक केल्यास शरीर आधीच जमा असलेले फॅट बर्न करते.
कमीत कमी 45 मिनिटे वॉक करा.
ब्रिक्स वॉक सुरु केल्यानंतर 20 मिनिटांनी शरीर ग्लुकोज बर्न करते. यानंतर फॅट बर्निंग सुरु होते.
इंटरवल वॉकींग स्टाईल फॉलो करा. यामध्ये 30 सेकंद वेगाने चाला. मग 30 सेकंद हळू चाला. असं 20 वेळा करा.
वॉकनंतर शरीरातून फॅटचे टॉक्सिन निघतात.
रात्रीच्या जेवणानंतर 15-20 मिनिट हळू चाला.