एका दिवसात किती बदाम खाणं शरीरासाठी योग्य?
Benefits of eating Almonds : बदामामध्ये अनेक पोषक तत्त्वं असतात. प्रोटीन, फायबर आणि आरोग्यदायी स्निग्ध घटकांनी बदाम परिपूर्ण असतो.
बदामाच्या सेवनामुळं वजन कमी करण्यास मदत होते. तुम्ही तो कोणत्याही प्रकारे खाऊ शकता. पण, त्याच्या सेवनावरही काही मर्यादा आहेत हे विसरून चालणार नाही.
आहारतज्ज्ञांच्या मते एका बदामात साधारण 165 कॅलरी आणि 6 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळं दिवसभरात 20 ते 23 बदाम अर्थात मुठभर बदाम खाणं शरीरासाठी फायद्याचं ठरतं.
मुठभर बदाम खाल्लायमुळं शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळता आणि रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही त्याची मदत होते. ज्यामुळं हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
बदामात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असतं. ज्यामुळं मेटाबॉलिक सिंड्रोम आणि टाईप 2 डायबिटीटच्या व्याधी बळावत नाहीत.
मॅग्नेशियम इन्सुलिन रेजिस्टंसचं काम करतं. त्यामुळं दररोज 56 ग्रॅम बदाम खाल्ल्यानं शरीराला आवश्यक असणाऱ्या मॅग्नेशियमचा पुरवठा बोतो आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.