आठवड्यातून किती दिवस नॉन व्हेज खावे? जाणून घ्या

तेजश्री गायकवाड
Dec 04,2024


काही लोकांना नॉनव्हेज खाण्याचे इतके शौकीन असतात की त्यांना रोज दिवस रात्र नॉनव्हेज खातात.


नॉनव्हेजमध्ये प्रोटीन असते जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते यात काही शंका नाही.


नॉनव्हेज आपल्याला व्हिटॅमिन बी 12, आयर्न आणि झिंक यांसारखे पोषक तत्व देतात. पण गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास शरीरालाही हानी पोहोचते.


जाणून घेऊयात की, आठवड्यातून किती दिवस नॉनव्हेज खाणे योग्य आहे.


आठवड्यातून फक्त 2 किंवा जास्तीत जास्त 3 दिवस नॉनव्हेज खाणे चांगले. यापेक्षा जास्त खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि फॅट वाढू शकते.


जर तुम्हाला नॉनव्हेज हवे असेल तर 1-2 वेळा मासे खा. हे हलके आणि पचायला सोपे असते.


आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा लाल मांस खाऊ नका. त्यात अधिक सॅच्युरेटेड चरबी असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.


अंडी आणि चिकन 2-3 दिवस खाऊ शकता. हे हलके आणि प्रथिने समृद्ध पदार्थ आहेत.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story