उन्हाळ्यात केस जास्त तेलकट आणि चिकट होतात. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
अनेक लोक केसांना रोज तेल लावतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, केसांना तेल लावणे हे योग्य आहे की चूक?
पाहूयात उन्हाळ्यात आठवड्यातून केसांना किती वेळा तेल लावले पाहिजे?
उन्हाळ्यात आठवड्यातून फक्त दोन वेळा केसांना तेल लावणे योग्य ठरते.
केसांच्या मुळांमध्ये हलकं तेल लावून काही वेळाने केस धुणं फायदेशीर ठरतं.
रोज केसांना तेल लावणं टाळावं. कारण त्यामुळे केस जास्त चिकट आणि खराब होऊ शकतात.
कोरडे आणि खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तेल लावणं पुरेसं आहे.
उन्हाळ्यात हलकं आणि नॉन-स्टिकी तेल वापरणं केसांसाठी योग्य फायदेशीर ठरेल.