उन्हाळ्यात अनेकांना तापमानामुळे त्रास होतो. शरीरात जळजळ, चक्कर येणे, त्वचेवर लाल चट्टे येणे अशा समस्या निर्माण होतात.
या त्रासांचा गर्भवती महिलांना दुप्पटीने सामना करावा लागतो. कारण त्यांच्या शरीरातील उष्णता आधीच वाढलेली असते.
उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी गर्भवती महिलांनी या गोष्टी केल्या पाहिजे.
शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशी फळं-भाज्या खाव्यात ज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल. जसे की कलिंगड, काकडी, फळांचे रस.
नेहमी थंड किंवा हवेशीर ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा. बाहेर गेल्यास ढगळे आणि हलके कपडे परिधान करा. थेट उन्हात जास्त वेळ राहू नका आणि गेलात तर टोपी- स्कर्फने डोकं झाका.
गर्भवती महिलांनी मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळावे. हलका, लवकर पचणारा आणि पौष्टिक आहारच घ्यावा. त्यामुळे बाळाची वाढही चांगली होते.
दुपारच्या तीव्र उन्हात जाणे टाळा. त्वचा खराब होऊ न देण्यासाठी सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे.
गर्भवती महिलांनी सकाळी लवकर सौम्य व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि तणावही कमी होतो.
उन्हाचा त्रास जाणवत असल्यास थंड पाण्याने अंघोळ करा. यामुळे थकवा कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो.