दिवसभराच्या कामाच्या व्याप्यामुळे आपण खूप थकून जात असतो.
स्त्रिया वेगवेगळ्या ब्युटी केअर ट्रीटमेंटमधून शरीरावरील ताण हलकं करतात.
पुरुष सहसा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
शारीरिक आरामासाठी आणि तणावापासून मुक्तीसाठी पुरुषांनीसुद्धा स्पा ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे.
स्पा ट्रीटमेंट शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण कमी करू शकते.
स्पा ट्रिटमेंटमुळे शरीर आरामशीर आणि मन शांत होऊन झोप छान लागते.
ही ट्रिटमेंट त्वचा स्वच्छ करते, एक्सफोलिएट करून पोषण देते.ज्यामुळे ती चांगली वाटते.
पाठदुखी, संधिवात किंवा स्नायू दुखणे यावर मालिश आणि काही स्पा थेरपी प्रभावी असू शकतात.
मसाज आणि हायड्रोथेरपी रक्ताभिसरण वाढवू शकतात. चांगले रक्ताभिसरण संपूर्ण आरोग्यसाठी योगदान देऊ शकते.