होमिओपॅथी डॉक्टर बनणं इतकं सोपं, बारावीनंतर काय करायचं?

होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षणात लक्षणांवर इलाज करण्याऐवजी आजार बरा करण्यावर लक्ष्य केंद्रीत केले जाते.

होमिओपॅथीचा शरिरावर कोणताही दुष्परिणाम जाणवत नाही, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.

जगातील 84 देशांमध्ये होमिओपॅथीने इलाज सुरु आहे. तर भारतात 2 लाख होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत.

होमिओपॅथी डॉक्टर बनण्यासाठी डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

बारावीनंतर यूजी,, पीजी, पीएचडी, डिप्लोमा सर्टिफिकेट करु शकता. हे 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी असू शकते.

यूजी कोर्स म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अॅण्ड सर्जरी (BMHS) हा डिग्री कोर्स करु शकता.

BHMS कोर्स करण्यासाठी बारावीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांमध्ये किमान 50 टक्के गुण, आरक्षित वर्गासाठी 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे.

या कोर्समध्ये प्रवेश होण्यासाठी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) पास होणे आवश्यक आहे.

कोर्स पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही सरकारी किंवा खासगी रुग्णालयात प्रॅक्टीस करावी. तुम्ही स्वत:चे क्लिनिक देखील उघडू शकता.

होमिओपॅथीचा शोध 1796 मध्ये जर्मन फिजिशिअन सॅम्युअल हॅनमनने केली होती. भारतात याची सुरुवात 19 व्या शतकापासून झाली.

VIEW ALL

Read Next Story