आपल्या आरोग्यासाठी दालचिनीचे फायदे हे अनेक आहेत. त्यामुळे आपल्याला त्याचा आपल्याला अनेक तऱ्हेचा फायदा होऊ शकतो.
दालचिनीमुळे आपल्याला डायबेटिस किंवा रक्तदाबासारखे रोग सतावत नाहीत.
त्यातून आपल्या केसांच्या आरोग्यासाठीही दालचिनी खाणं हे फायदेशीर ठरते.
आपल्याला कोलेस्ट्रॉलपासूनही दालचिनी ही फायदेशीर ठरते.
इतक्या गुणधर्मांनी समृद्ध अशी दालचिनी ही जर का खोटी असेल तर?
अशा वेळी आपल्याला दालचिनीतील फरक जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला दालचिनीच्या ऐवजी जर का कोणी पेरूचं साल देत असले तर तुम्हाला त्याचा तुमच्या शरीरासाठी धोकादायक परिणाम होऊ शकतो.
तेव्हा अशावेळी तुमच्या दालचिनीचा रंग हा डार्क असला पाहिजे आणि सोबतच त्याचा वासही उग्र असावा. मसालेदार असावा.
त्यातून जर का दालचिनीचे साल पातळ नसेल तर ती खोटी आहे.