थंडीचं आगमन होताच सोबत खोकला, सर्दी असे आजारही वाढतात. पण काही घरगुती उपचारांनी या समस्या दूर करु शकता. सर्दी, खोकला झाल्यास आपल्याच घराच्या किचनमधील काही गोष्टींचा वापर करत तुम्ही बरे होऊ शकता.
बदलत्या ऋतूमध्ये खोकला आणि सर्दीची समस्या वारंवार उद्भवते, अशा परिस्थितीत काही गोष्टींचे सेवन करून तुम्ही या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता.
जर तुम्ही चहाचं सेवन करत असाल तर हेल्दी बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला हिवाळ्यात आराम मिळेल. यासाठी तुम्ही आले आणि लवंगाचा चहा प्या, ज्याचे फायदे होतील.
आल्याच्या चहाचं दोन वेळा सेवन केल्याने तुमची सर्दी आणि खोकल्यापासून सहज सुटका होईल. तसंच पोटाशी संबंधित अनेक समस्याही दूर होतील.
ऋतुशी संबंधित समस्यांमध्ये आवळाही फार गुणकारक आहे. यामधील विटॅमिन सी मुळे तुम्हाला केसांच्या आणि गळ्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
आवळा खूप फायदेशीर आहे, त्यात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
तुळशीच्या पानांचा रस आणि मध यांचं एकत्र सेवन केल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचण्यास मदत मिळते. त्यामध्ये असलेले अनेक प्रकारचे पोषकतत्वं शरीरातील बॅक्टेरिया काढून टाकतात.
जर तुम्हाला डांग्या खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही दिवसातून दोनदा तुळशीचा रस आणि मध यांचं सेवन करा.
अंबाडी बिया खूप उष्ण असतात, त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने सर्दीची समस्या लवकर दूर होते. यामध्ये असलेली अनेक जीवनसत्त्वे आणि पोषकतत्वं आपल्याला आतून उबदार ठेवण्यास मदत करतात.