दिवाळीत सुकामेवा खरेदी करताना बनावट बदाम कसे ओळखाल?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Nov 04,2023

बदामाचे फायदे

शरीराला पोषणतत्त्व मिळावेत म्हणून बदाम खाल्ले जाते. सकाळी दररोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने फायदा होतो. केसांची वाढ चांगली होते आणि शरीर बळकट होते.

हृदयाचे आरोग्य

हृदयविकार असणाऱ्यांनी तर बदाम खायलाच हवे. तुमच्या आरोग्यासाठी बदाम हे उत्तम आहेत.

मधुमेह कंट्रोलमध्ये राहते

जर तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तरी देखील तुम्ही बदामाचे अगदी हमखास सेवन करु शकता. कारण बदामामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

भेसळयुक्त बदाम -1

खोटे भेसळयुक्त बदाम ओळखण्यासाठी ते तुमच्या तळहातावर घासून घ्या बदामाला चोळताना त्याचा रंग निघत असेल तर तो बनावट आणि भेसळ आहे हे समजून घ्या.

भेसळयुक्त बदाम -2

तुम्ही बदामाच्या रंगावरूनही ते ओळखू शकता. खऱ्या बदामाचा रंग हलका तपकिरी असतो, तर भेसळयुक्त बदामाचा रंग गडद दिसतो.

भेसळयुक्त बदाम -3

भेसळयुक्त बदाम ओळखण्यासाठी, काही वेळ कागदावर दाबून ठेवा. असे केल्याने कागदावर तेलाच्या खुणा दिसत असतील तर बदाम चांगल्या क्वालिटीचे आहेत, असे समजावे.

भेसळयुक्त बदामाचे परिणाम

याशिवाय भेसळयुक्त बदामांना पॅकिंगवरूनही ओळखता येते. ते खरेदी करताना पॅकिंगवर लिहिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.अनेक वेळा भेसळ करणारे ब्रँडचे पॅकिंग कॉपी करून बाजारात विकतात. ते सहज ओळखता येते.

या आजारांचा धोका

नकली बदाम खाल्ल्याने तुमच्या शरीराला पोषण तर मिळत नाहीच. पण त्यांचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. जास्त काळ भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने कर्करोगासारखे आजारही होऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story