शरीरात प्रोटीनच्या कमतरता आहे हे सांगतात 'ही' लक्षणं

Tejashree Gaikwad
Feb 28,2025


प्रोटीन हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे स्नायू, त्वचा, केस आणि नखे तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.


शरीरात प्रोटीनची कमतरता असल्यास ती अनेक लक्षणांच्या रूपाने दिसू लागते. चला ही लक्षणं जाणून घेऊयात...

सतत थकवा आणि अशक्तपणा

जर शरीराला पुरेसे प्रोटीन मिळत नसेल तर ते स्नायू तोडून ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न करते. यामुळे अशक्तपणा, थकवा आणि उर्जेची कमतरता जाणवू लागते.

केस गळणे आणि नखं तुटणे

जर तुमचे केस खूपगळत असतील किंवा तुमची नखे सहज तुटत असतील तर तुमच्या आहारात पुरेसे प्रोटीन नसल्याचं हे लक्षण असू शकतं.

पाय आणि घोट्यात सूज येणे

जर तुमचे पाय, घोट्याला किंवा तुमच्या शरीराच्या इतर भागांना सूज येत असेल, तर हे लक्षण प्रोटीनची कमतरता आहे हे दर्शवते.

सांधे आणि स्नायूत वेदना

प्रोटीनच्या कमतरतेमुळे स्नायूंचा बिघाड होऊ शकतो, ज्यामुळे सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना होऊ शकते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story