उन्हाळ्यात बहुतेक घरांमध्ये एसीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. एसी चालू असताना त्यातून भरपूर पाणी बाहेर पडते, जे बहुतेक वेळा वाया जाते.
एसीच्या पाईपला एक अतिरिक्त पाईप जोडून ते पाणी बादली किंवा टाकीत साठवावे.
एसीच्या पाईपला एक अतिरिक्त पाईप जोडून ते पाणी बादली किंवा टाकीत साठवावे.
जाणून घेऊयात या पाण्याचा वापर कुठेकुठे केला जाऊ शकतो.
एसीमधून बाहेर पडणारे पाणी झाडांना पाणी देण्यासाठी वापरले जाऊ शकते.
हे पाणी फरशी पुसण्यासाठी किंवा घराच्या इतर भागांच्या स्वच्छतेसाठी वापरता येते.
एसीचे पाणी स्वच्छ असते. त्यामुळे ते गाडी धुण्यासाठी वापरले जाऊ शकते.
एसीचे पाणी तुम्ही एअर कुलरमध्ये भरून त्याचा पुन्हा वापर करू शकता.
बाथरूम स्वच्छ करण्यासाठी किंवा कमोडच्या फ्लशिंगसाठीही या पाण्याचा उपयोग केला जाऊ शकतो.
एसीमधून येणारे पाणी स्वच्छ असले तरी ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळे हे पाणी प्यायला वापरू नये.