उन्हाळ्याचे तापमान झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे अनेकांना त्वचासंबंधित तसेच आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.
उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. कारण या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते.
प्रखर सूर्यकिरणांचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे अनेकजण त्वचेला सुर्याच्या धोकादायक किरणांपासून वाचवण्यासाठी विविध उपाय करत असतात.
त्यातील एक महत्त्वाचा उपाय म्हणजे सनस्क्रिनचा वापर. मात्र, बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की सनस्क्रिन दिवसातून किती वेळा लावले पाहिजे.
सनस्क्रिन तुम्ही दिवसातून प्रत्येक 2.5 ते 3 तासांच्या अंतराने पुन्हा लावावे.
जर तुम्ही घाम येईल असे शारीरिक परिश्रम करत असाल किंवा पाण्यात गेलात, तर पुन्हा सनस्क्रिन लावणे आवश्यक आहे.
सनस्क्रिन लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते, कोरडी पडत नाही आणि हानिकारक UV रेजपासून तुमची त्वचा सुरक्षित राहते.
घरात असतानाही तुम्ही सनस्क्रिनचा हलका थर लावावा. कारण UV रेज खिडकीतूनही आत येऊ शकतात.