सतत पादायचा होतोय त्रास? मग 'हे' सोपे उपाय करा
बदललेली जीवनशैली, तासंतास बसून काम आणि त्यात चुकीच्या खाण्याच्या पद्धतीमुळे अनेकांना पोटाचे विकार होतात.
पोटात गॅस आणि अँसिडिटीमुळे अनेकांना सतत पादायचा त्रास होतो. या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत.
भाजलेला ओवा खाल्याने गॅसची समस्या दूर होते. अगदी सकाळी उठल्यावर गरम पाण्यात ओवा घालून प्यायल्यानेही फायदा होतो.
नियमित ताकाचं सेवन केल्यामुळे गॅसची समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय अॅसिडीटीपासूनही मुक्ती होईल.
पोटात जळजळ, गॅस, अॅसिडीटीवर केळं हे रामबाण उपाय आहे. त्यामुळे केळाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
1 कप पाणी आणि 2 मोठे चमचे अनफिल्टर्ड अॅप्पल साईड व्हिनेगर घेतल्यास तुमच्या पोटाशी संबंधित अनेक विकार दूर राहतात.
गॅस समस्येवर जिऱ्याचे पाणी सर्वाधिक मारक आहे. 1 चमचा जिरे एक कप पाण्यात उकळवा आणि नंतर थंड करुन त्यांचं सेवन करा.
पोटात गॅस झाले असल तर लंवग खाणे हेहीदेखील फायदेशीर ठरु शकतं.
दालचिनी चहा हा पोटाशी संबंधित विकारावर रामबाण घरगुती उपाय आहे. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधील संक्रमण दालिचीनी चहामुळे बरं होतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)