भाज्यांसाठी केलेल्या वाटणांमध्ये आलं प्रामुख्याने वापरलं जातं. तसंच, चहामध्येही आल्याचा वापर केला जातो
आलं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही ते सुकतं आणि त्यात काहीच रस शिल्लक राहत नाही.
अशावेळी आलं दीर्घकाळ कसं टिकवून ठेवायचं असा प्रश्न पडतो? त्यासाठी वापरा या टिप्स
1-2 आठवड्यांसाठी आलं टिकवायचं असेल तर सामान्य तापमानावर ठेवू शकता. मात्र, ते कोरड्या ठिकाणी ठेवा
आलं साठवून ठेवायचं असेल तर ते तुम्ही रिफ्रिजरेटरमध्येही ठेवू शकता. मात्र, अनेकदा आल्याला बुरशी लागू शकते. त्यामुळं प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा
आलं जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी ते झिप लॉक बॅगमध्ये ठेवा
आलं सीलबंद पिशवीत भरुन ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता
आलं किसलेले किंवा सोललेले असेल तर ते लगेच वापरा अन्यथा ते लगेच खराब होते
जर आलं जास्त असेल तर त्याची पेस्ट बनवा मात्र, पेस्ट बनवताना त्यात पाण्याऐवजी तेल व मीठ वापरा
आल्याच्या पेस्टचा बर्फ बनवून फ्रीजरमध्ये ठेवा. व गरज पडल्यास वापरा