पावसाळ्यात भाज्या दीर्घकाळापर्यंत कशा टिकवाल? ही पद्धत वापरुन पाहा

Mansi kshirsagar
Jul 16,2023


पावसाळ्यात भाज्यांमध्ये किडे आढळणे आणि त्यांना बुरशी लागणे असे प्रकार सहज घडतात. त्यामुळं मान्सूनमध्ये भाज्या दीर्घकाळापर्यंत कशा टिकवून ठेवणार असा प्रश्न गृहिणींना पडतो.


पालेभाज्या पावसाच्या दिवसांत लवकर खराब होतात. पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यांना बुरशी लागते. त्यामुळं जाणून घेऊया पावसाळ्यात भाज्यांची काळजी कशी घ्यावी.


पावसाळ्यात नेहमीच ताजी भाजी खरेदी करा. खरेदी करण्यापूर्वी भाजीचा छोटासा तुकडा तोडून बघा त्यामुळं तुम्हाला भाजी ताजी आहे का याचा अंदाज येईल


भाजी थोडीशी जरी काळपट असेल तर अशी भाजी खरेदी करताना टाळावे.


ताजी भाजी ओळखताना तुम्ही भाज्यांचा वास घेऊ शकता. जर भाजी खराब असेल किंवा आत किडे असतील तर त्याच्या वासाने तुम्हाला ओळखणे सोप्प होईल


भाज्या खरेदी करुन झाल्यानंतर त्या योग्यपद्धतीने स्टोअर करणे हे मोठं कठिण काम असते. जर योग्य पद्धतीने स्टोअर केल्या नाही तर त्या लवकर खराब होतील.


बाजारातून भाज्या घेऊन आल्यानंतर त्या गरम पाण्यातून चांगल्या धुवून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात मीठदेखील टाकू शकता.


भाज्या धुण्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात एक टीस्पून बेकिंग सोडा टाका व नंतर भाज्या धुवून घ्या. त्यानंतर भाज्या सुकवून घ्या


भाज्या सुकल्यानंतर एका सुती कपड्यामध्ये योग्य पद्धतीने ठेवून फ्रीजमधील खालच्या भागात ठेवून द्या. फ्रीजमध्ये ठेवताना भाज्या एकाखाली एक ठेवू नका.

VIEW ALL

Read Next Story