काम करताना वांरवार जांभई येत असेल तर शरीरात असू शकते 'या' गोष्टींची कमतरता

Intern
Mar 28,2025


जांभई येण्याची अनेक कारणं असू शकतात. जसे की थकवा, ताण, अपुरी झोप आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता.


यावर आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय करु शकतात.

1. पाणी प्यावे

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे जांभई येऊ शकते, त्यामुळे भरपूर पाणी प्यायला हवे.

2. खोल श्वास

खोल आणि हळूहळू श्वास घेतल्याने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे थकवा आणि जांभई कमी होऊ लागते.

3. हलका व्यायाम

हलका व्यायाम किंवा चालण्यामुळे शरीर ताजेतवाणे होते आणि जांभई कमी होऊ लागते.

4. निरोगी आहार

संतुलित आहार घ्या, ज्यात पुरेशी प्रथिने, फळं आणि भाज्या असतील. कॅफिन देखील जांभई कमी करण्यास मदत करू शकतो.

5. पुरेशी झोप

झोपेच्या कमतरतेमुळे जांभई येऊ शकते. म्हणून पुरेशी आणि गाढ झोप घेण्याचा प्रयत्न करा.

6. कमी ताण घ्या

ताणामुळे देखील जांभई येऊ शकते. योगा, ध्यान किंवा विश्रांती यामुळे ताण कमी होतो.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story