उन्हाळ्यात लोक विविध पदार्थांचे सेवन करतात. मात्र, काही पदार्थ असे असतात ज्याचे उन्हाळ्यात सेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
जाणून घेऊयात उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नयेत.
उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ टाळावे. कारण, त्यामुळे पोटात जळजळ, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यात बाहेरचं अन्न खाणं टाळावं. घरी तयार केलेल्या पौष्टिक अन्नाचे सेवन करणे योग्य असते.
चहा आणि कॉफीच्या अति सेवनामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यापासून उन्हाळ्यात दूर राहावे.
उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. त्यामुळे शिळं अन्न खाणे आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते.
तळलेले पदार्थ तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करु शकतात, म्हणून तेलकट पदार्थ खाणं टाळावे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)